प्रस्तुत महाविद्यालय धुळे जि. धुळे येथून 15 जून 1968 या वर्षी परभणी येथे स्थलांतरित झाले असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संलग्नतेनुसार व नियंत्रणानुसार कार्यरत आहे.
तज्ज्ञ व शैक्षणिक जाण असणारे प्राचार्य व प्राध्यापक वृंदामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण समृध्द असून हीच आमच्या महाविद्यालयाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. गत 46 वर्षांच्या कालावधीत महाविद्यालयातून सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास 5000 आहे. प्रशिक्षीत शिक्षक शिक्षण क्षेत्रात उच्च पदांवर तसेच प्रशासकीय सेवेत यशस्वीपणे कार्यरत आहेत. अनेक शिक्षक स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.
महाविद्यालयाच्या निकालाची यशस्वी परंपरा प्रशिक्षणार्थी पुढे नेत आहेत. नियमित बी.एड. बरोबर य.च.म.मु.वि. नाशिकचे सुट्टीतील बी.एड. केंद्र कार्यन्वित आहे.
सुसज्य ग्रंथालय हे महाविद्यालयाचे वैशिष्टय असून शहर व जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील बहुसंख्य व्यक्ती या ग्रंथालयाच्या सदस्य आहेत.
सन 2004-2005 पासून महाविद्यालयाचे उन्नयीकरण सी.टी.ई. मध्ये झाल्यामुळे महाविद्यालयाचे कार्यक्षेत्र परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या 5 जिल्हयातील माध्यमिक शिक्षकांना सेवाअंतर्गत प्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसन होत आहे. हे आमच्यासाठी भूषणावह आहे.
डॉ.सुनंदा रोडगे
प्राचार्य,
शासकीय अध्यापक महाविद्यालय,परभणी